Ad will apear here
Next
जॉर्ज कॉफ्मन
दोन महायुद्धांच्या काळातल्या ब्रॉडवेवरच्या सर्वांत लोकप्रिय आणि हिट नाटकांचा लेखक-दिग्दर्शक असलेला आणि सहकाऱ्यांच्या साथीने लिहिलेल्या तब्बल ४५ नाटकांपैकी बहुतेक सर्वच कमालीची यशस्वी ठरण्याचे भाग्य लाभलेला अमेरिकेचा तुफान लोकप्रिय नाटककार जॉर्ज कॉफ्मनचा १६ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याच्याविषयी....
.....
१६ नोव्हेंबर १८८९ रोजी पेनसिल्व्हानियामध्ये जन्मलेला जॉर्ज कॉफ्मन हा गेल्या शतकातला अमेरिकेचा महत्त्वाचा नाटककार, पत्रकार आणि समीक्षक. त्याने राजकीय प्रहसनं लिहिली, विनोदी नाटकं लिहिली आणि काही संगीतिकाही लिहिल्या. नील सायमन वगळता इतर कोणत्याही विनोदी अमेरिकन नाटककाराला त्याच्याइतकी लोकप्रियता लाभली नव्हती. 

दोन महायुद्धांच्या काळातल्या ब्रॉडवेवरच्या सर्वांत लोकप्रिय आणि हिट नाटकांचा तो लेखक-दिग्दर्शक होता. त्याने बहुतेक वेळा सहकाऱ्यांच्या साथीने तब्बल ४५ नाटकं लिहिली आणि बहुतेक सर्वच कमालीची यशस्वी ठरली. त्याच्या नाटकांमधल्या योगदानाबद्दल त्याला दोन वेळा पुलित्झर पारितोषिक मिळालं होतं. 

दी मॅन हू केम टू डिनर, यू कान्ट टेक इट विथ यू, मेरीली वुई रोल अलाँग, दी बटर अँड एग मॅन, डल्सी, स्टेज डोअर, ऑफ दी आय सिंग, दी कोकोनट्स, डिनर अॅट एट, असं त्याचं लेखन तुफान लोकप्रिय झालं होतं.

त्याची अनेक चमकदार वाक्यं प्रसिद्ध आहेत जसं – ‘वकील म्हणजे अजब जमात असते. दिवसभर एकत्र जमून खलबतं करत असतात, की आता काय बरे पोस्टपोन करता येईल? एकच गोष्ट ते पुढे ढकलत नाहीत, ते म्हणजे त्यांची बिलं! एका माणसाला म्हणे असं बिल आलं होतं, - रस्ता क्रॉस करून तुमच्याशी बोलायला आल्याबद्दल (आणि ते तुम्ही नव्हतात हे नंतर कळल्याबद्दल) – १२ डॉलर्स!  किंवा ‘ऑफिसची वेळ १२ ते एक अशी असून एक तास जेवणाची सुट्टी असेल’ किंवा ‘मला असा डॉक्टर हवाय, की जेव्हा तो मला तपासत नसेल तेव्हा घरी बसून मेडिकलचा अभ्यास करत असेल.’ 

त्याने मार्क्स ब्रदर्ससाठी अनेक नाटकं लिहिली; पण ते त्याने लिहिलेल्या डायलॉग्जपेक्षा स्वतःच्या अॅडीशन्स जास्त घ्यायचे म्हणून त्याने म्हणे एकदा त्यांचा शो चालू असताना थेट स्टेजवर एंट्री घेतली आणि म्हणाला, ‘मध्येच आल्याबद्दल माफ करा; पण मला आता चक्क मी लिहिलेली एक ओळ ऐकल्यासारखं वाटलं......म्हणून!’ 

तो प्रचंड हजरजबाबी होता. एकदा एका नटीने स्वतःच एक नाटक लिहिलं आणि ती त्याला सांगत आली, ‘माझ्या नाटकात काही नेपथ्यच नाहीये. पहिल्या सीनमध्ये मी डाव्या विंगेजवळ असते तेव्हा लोकांनी इमॅजिन करायचं की मी एका गर्दीच्या हॉटेलमध्ये आहे. दुसऱ्या सीनमध्ये मी उजव्या विंगेजवळ असते तेव्हा लोकांनी इमॅजिन करायचं, की मी माझ्या घरी बेडवर आहे...’ त्यावर कॉफ्मन तिला पटकन तोडत म्हणाला... ‘मग पुढच्या शोला तुला इमॅजिन करावं लागेल, की समोर प्रेक्षक आहेत...’ 

दोन जून १९६१ रोजी त्याचा न्यूयॉर्कमध्ये मृत्यू झाला.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZSIBI
Similar Posts
शिरीष पै, सुहास शिरवळकर केवळ तीन ओळींमध्ये आशय आणि भावना मांडण्याचा ‘हायकू’ हा काव्यप्रकार मराठीत रुजवणाऱ्या शिरीष पै, ‘दुनियादारी’ या जबरदस्त कादंबरीने अवघ्या तरुणाईला भुरळ पाडणारे सुहास शिरवळकर आणि समाजभूषण चरित्रकार पुरुषोत्तम पांडुरंग गोखले यांचा १५ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय
आनंद अंतरकर आपले वडील अनंत अंतरकर यांच्या पश्चात ‘हंस’सारख्या मासिकाच्या संपादनाची धुरा यशस्वीपणे वाहणाऱ्या आणि स्वतः उत्तम लेखन करणाऱ्या आनंद अंतरकर यांचा १८ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय....
रत्नाकर मतकरी खेकडा, कळकीचे बाळ यांसारख्या एकाहून एक उच्च दर्जाच्या गूढकथा लिहिणारे आणि लोककथा ७८, प्रेमकहाणी, आरण्यक, चार दिवस प्रेमाचे यांसारखी सरस प्रयोगशील नाटकं लिहिणारे रत्नाकर मतकरी यांचा १७ नोव्हेंबर हा जन्मदिवस. त्या निमित्ताने आज ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
मंगेश राजाध्यक्ष, सुमती पायगावकर ज्येष्ठ समीक्षक आणि खुसखुशीत लेखांसाठी प्रसिद्ध असणारे मं. वि. राजाध्यक्ष आणि बालसाहित्यकार सुमती पायगावकर यांचा सात जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language